सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवार समोरासमोर रिंगणात असून शुक्रवार दि.२८ तालुक्यात ४ केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी सकाळी ८ वाजल्यापासून गर्दी केली होती.तर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली.
तालुक्यातील किकवी ,आंबेघर ,नसरापूर तसेच भोर येथील चार बुथवर सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले.१४ जागांसाठी ११ कृषी पतसंस्थांमधून तर ३ ग्रामपंचायतमधून लढविल्या जात आहेत.तालुक्यातील ४ बुथवर विविध कार्यकारी विकास सोसायटीचे ८९७ तर ग्रामपंचायतचे ११७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.