सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सौ कुमुदिनी सुशांत कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्षा श्रीमती जयश्री धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त उपनगराध्यक्ष निवडीकरिता लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा पालिकेच्या दिनबंधू दिनकररावजी यादव सभागृहात संपन्न झाली यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सुहास गाडे कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते
उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राजश्री शाहू विकास आघाडीच्या सौ कुमुदिनी कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड सभेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी उपनगराध्यक्षपदी सौ कुमंदिनी कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले सौ कांबळे यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी हलगीच्या कडकडाटामध्ये गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला .
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक द .कांबळे , अशोक शं कांबळे राजेंद्र प्रधान सुरज कांबळे नगरसेवक प्रकाश गावडे , पत्रकार दगडू माने सुरेश कांबळे प्रधान, आदींनी शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की राजश्री शाहू आघाडीत ठरल्याप्रमाणे सर्वांना समान संधी न्याय या धोरणानुसार प्रत्येक सत्ताधारी नगरसेवकांना विविध पदावरती काम करण्याची संधी देण्यात आली आहे यामुळे उपनगराध्यक्षपदी सौ कुमुदिनी कांबळे यांना संधी मिळाली आहे यापुढेही तेच धोरण चालू राहील शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास सत्ताधारी मंडळीकडून सुरू आहे शिरोळ शहराला पाणीपुरवठा करणारी 28 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे प्रत्येक प्रभागाचा विकास करून नागरिकांना मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटपीत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले .
नूतन उपनगराध्यक्षा सौ कुमुदनी कांबळे म्हणाल्या की प्रभागातील जनतेने प्रथम नगरसेविका होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेते मंडळींनी प्रथम मागासवर्गीय महिला उपनगराध्यक्षा होण्याचा मान देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली या पुढच्या काळात ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन दिले
या वेळी माजी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी , पैलवान प्रकाश गावडे ,राजेंद्र माने तातोबा पाटील श्रीमती जयश्री धर्माधिकारी, सौ कमलाबाई शिंदे, सुरेखा पुजारी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौ सुनीता आरगे नगरसेविका करुणा कांबळे अनिता संकपाळ, नगरसेवक इम्रान अत्तार श्रीवर्धन माने देशमुख राजाराम कोळी अण्णासाहेब गावडे ,एन वाय जाधव बाळासाहेब कांबळे सुशांत कांबळे, सुरज कांबळे ,संतोष कांबळे ,फुलकेश कांबळे रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील सर्व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी उपनगराध्यक्षा सौ कांबळे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची विजयी मिरवणूक काढली.
COMMENTS