वाघळवाडीतील एकाने धुळ्याच्या मित्राला हाताशी धरून ..साताऱ्यात मारला सोन्यावर डल्ला...पोलिसांनी ५४ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींच्या मुसक्या आवळल्या..त्यांनी निरेतील सोनाराला २१ तोळे विकल्याची कबुली दिली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी वृद्ध महिलांची फसवणूक करून २१ तोळे सोने लुटल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील विजय सुभाष नवले वय ३९ व विकी साळुंखे वय २२ रा. धुळे यांच्या मुसक्या अवळक्या असून त्यांनी हे सोने नीरा ता. पुरंदर येथील सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे.
           सविस्तर हकीकत अशी, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी जुना मोटार स्टैंड येथील सुमित्रा राजे व्यापारी संकुलाचे बेसमेंटमध्ये एका वृध्द महिलेस अनोळखी इसमांनी शेठला बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला आहे, तो गरीब लोकांना साडी वाटप करणार आहे असे आमीष दाखवून वृध्द महिलेचे अंगावरील सुमारे दिड तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ व पर्स असा एकुण ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज हातचलाखीने काढुन फसवणुक करुन घेवुन गेले बाबत शाहुपूरी पोलीस ठाणे येथे तक्रार प्राप्त झाली होती. त्यांचे तक्रारी वरुन शाहुपूरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
      सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर  सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू
बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी  गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व डी. बी. अंमलदार यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
        त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी / अंमलदार यांनी गुन्ह्याचे ठिकाणी भेट देवुन गुन्ह्यांबाबत माहिती घेत घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली व संशयीत इसमांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. वृध्द महिलांना फसवणुक करण्याचे प्रकार घडत असल्याने डी.बी. पथकाने घटनास्थळासह, सातारा शहर. सातारा तालुका व टोलनाका परिसरातील तब्बल ५४ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी फुटेजमध्ये संशयीत इसम व मोटार सायकलचे वर्णन प्राप्त झाले. सदर फुटेजचे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेस पुणे येथील एका संशयीत इसमाची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने पुणे येथे जावुन सदर संशयीत इसमांस ताब्यात घेणेबाबत कारवाई करीत असताना सदर इसमांस पोलीस आलेची चाहुल लागल्याने सदरचा इसम हा पुणे येथून पळून गेला. त्यानंतर सर्व संशयीत इसम हे परागंदा झाले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाणचे अधिकारी / अंमलदार यांनी नमुद संशयीत इसमांचे हालचालीवर सलग पाळत ठेवली. दरम्यान गुन्हयातील काही संशयीत इसम हे धुळे येथे त्यांचे राहते घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन आरोपी शोधकामी धुळे येथे रवाना केले. सदर पथकाने धुळे येथे जावुन नमुद संशयीत इसमांचे राहते वस्तीचे परिसरात वेशांतर करुन पाहणी केली. व त्यांचे राहते ठाव ठिकाणाची माहिती घेवून व पाळत ठेवून संशयीत इसमांचे पैकी दोन इसमांना ताब्यात घेतले. नमुद इसमांचा धुळे येथून ताबा घेवुन त्यांना शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्यांनी नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तदनंतर त्यांचेकडे अधिक कौशल्याने विचारपुस केली असता त्यांनी सातारा शहरासह कोरेगांव, सांगली, कोल्हापुर, मुंबई, फलटण, नंदुरबार, अ.नगर इ शहरामध्ये जेष्ठ नागरीकांना शेठला खुप वर्षांनी मुलगा झाला असुन तो साडीवाटप करीत आहे, धान्यवाटप करीत आहे. अशा प्रकारे अमीष देवुन त्यांना अंगावरील दागिणे काढण्यास सांगुन शेठला घेवुन येतो असे सांगुन निघुन जात होते. अशा प्रकारे नमुद ठिकाणी जावून जेष्ठ नगारीकांची फसवणुक केले बाबत व सदरचे सोन्याचे दागिणे हे निरा येथील एका ज्वेलर्सचे दुकानामध्ये दिल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन एकुण ११ हजार ४९ हजार २८० रुपये किंमतीचे २१ तोळे वजनाचे सोने हस्तगत करणेत आले आहेत. तसेच सदर आरोपी यांचेकडुन गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या ९५ हजार रुपये किमतीच्या दोन
मोटार सायकली व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १२ लाख ४४ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
तसेच नमुद आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे एकुण 10 विविध ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
          अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने फसवणुकीचे दाखल गुन्हयांमध्ये वृध्द महिलांना अमीष दाखवुन लुबाडणाऱ्या संशयीत इसमांचे बाबात वेळोवेळी घडलेल्या गुन्हयांची माहिती संकलीत करुन गुन्हयांचा सलग सुमारे ६ महिन्यांपासुन बारकाईने तपास करत त्यामधील संशयीत इसमांची सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेष्ण व गोपनिय माहितीचे आधारे संशयीत इसमांचे माहिती प्राप्त करुन त्यांना धुळे येथुन ताब्यात घेवुन महाराष्ट्र राज्यभर वृध्द महिलांना अमीष दाखवून सोन्याचे दागिणे लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. व त्यांचेकडुन लुबाडलेले एकण २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १२ लाख ४४ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून फसवणुकीचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. सदर आरोपी यांनी अशाच प्रकारे अमीष दाखवून वृध्दांना लुबाडल्याचे घटना घडलेल्या असतील त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेस किंवा नजीकचे पोलीस ठाणेस संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक  बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक  प्रशांत बधे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लैलेश फडतरे, हसन तडवी, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे. सदर कारवाईबाबत मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा  समीर शेख यांनी शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.
To Top