सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
मेढा : प्रतिनिधी
बंद पडलेल्या संस्थेवर निवडणूक लादायची आणि ती संस्था तोट्यात घालवून तोट्यातील संस्था कशी चालवाताय ते पहायचे अशी भावना विरोधकांची असून निवडणूक पडण्यासाठी लावायची. निवडून येण्याची किंमत शुन्य अशी टिका करीत विरोधाकांचे सहकारात काय योगदान आहे शुन्य, मग तालुक्यातील सहकार चळवळ वाचविण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी तुमचे योगदान काय असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना केला.
शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ मेढा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी उपसभापती सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढ्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, दत्ताआण्णा पवार, बाबूराव संकपाळ, शिवाजीराव मर्ढेकर, गीता लोखंडे, रामभाऊ शेलार, प्रमोद पार्टे, जयदीप शिंदे यांच्यासह पॅनलचे उमेदवार, बिनविरोध निवडून आलेले बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले,
निवडणूक बिनविरोध करायची होती. संस्था चांगली चालावी, उगाचच संघर्ष करायचा नाही यासाठी बिनविरोध करायची ठरवले पण कायम पडण्यासाठीच उभे राहणारानी ही निवडणूक लावली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत ही हेच केले. यामध्ये यांचा मी पना आडवा येत असून मला विचारले नाही एवढ्या साठीच निवडणूक लावली आहे. या निवडणुकीला पक्षाचा रंग दिला नाही कारण
संस्था महत्वाची आहे. संस्थेला उत्पन्न साधन नाही. त्यामुळे संस्था मोठी झाली की निवडणूक लढवा असे आवाहन ही त्यांनी केले.
ते पुढे म्हणले आम्ही आ. शशिकांत शिंदे, मकरंद पाटील व इतर सर्व वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलोय. या निवडणुकीत आपल्यातल्या आपल्यात दगाफटका होणार नाही याची काळजी घ्या. एकामेकांच्या जिरवाजिरवीत पॅनलचे नुकसान करू नका असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
माजी उपसभापती सौरभ शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याचे भंगार विकून खाल्ले या माजी आ. सदाशिव सपकाळ यांच्या आरोपावर तुम्ही सुरू करणार असलेला ग्लुकोज कारखाना कुठे गेला असा प्रश्न करून पारले जी बिस्कीट गत कारखाना पन विरघळला का असा सवाल उपस्थित केला.
यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी दुकान नाडापूडीच अन ऐट फौजदाराची असे म्हणत आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी महाराज साहेब नेहमीच आपल्या मदतीला धावुन येत असतात त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्वानी उभे स विचार व्यक्त केले. बाबुराव संकपाळ यांनी संस्था संस्था चांगली चालवा, संस्थेसाठी महाराज साहेबांनी लक्ष घालाव व प्रगती करावी असे सांगितले.