सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील ध्येय अभ्यासीकेमधील ४ विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर विद्यार्थ्यांचे पोलीस भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ध्येय अभ्यासिकेच्या माध्यमातून योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.अभ्यासिकेतील ऋषिकेश वीर ( रा .उत्रोली ), कोमल वीर ( रा. नऱ्हे ),मनिषा चौधरी ( रा.दुर्गाडी) व वंदना पोळ (रा.पोळवाडी ) अशा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्याचा पालकांचा सत्कार समारंभ पोलिस उपनिरीक्षक जाधव साहेब यांचे हस्ते पार पडला.यावेळी गरजू विद्यार्थ्यांना हवी ती मदत करण्याचं आश्वासन पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दिले.तर पतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे व सहकार्य यामुळे पोलिस बनू शकले असे कोमल वीर म्हणाल्या.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र करीयर अकॅडमीचे कारंडे सर व स्वप्नील जावीर उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन अभ्यासिकेच्या संस्थापक सौ. पौर्णिमा जावीर यांनी केले होते.
COMMENTS