भोर ! खरेदी-विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी मधुकर कानडे व दिलीप वरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी वीसगाव खोऱ्यातील दिलीप वरे व मधुकर कानडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खरेदी विक्री संघावर एक चेअरमन व तीन संचालक यांची निवड झाल्याने विसगाव खोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा गोवला गेला आहे.
            खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात बुधवार दि.२६ झालेल्या बैठकीत दोन्ही स्वीकृत संचालकांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन अतुल किंद्रे,व्हा.चेअरमन अतुल शेडगे,सचिव विलास बुदगुडे,संचालक संपत दरेकर ,नरेश चव्हाण ,सोमनाथ सोमानी, सुजाता जेधे, दत्तात्रय कांबळे, विजय शिरवले,विठ्ठल खोपडे,बबन गिरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते
To Top