सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात अनेक घडामोडी घडत असून महाविकास आघाडी च्या सोमेश्वर सहकार पॅनल मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला एकही जागा दिली नाही. तर आता महाविकास आघाडीच्या पत्रिकेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप यांचे नाव काढून टाकण्यात आले असल्याने एकच चर्चा ला उदान आले आहे
निवडणुकीपूर्वी शिवसेनेला एक जागा देण्यासंदर्भात चर्चा सुरू होत्या परंतु अचानकपणे काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला कोंडीत पकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी अर्धा तास महिलेची जागा घ्या अन्यथा जागा मिळणार नाही असे सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाने एकही महिलेचा उमेदवार अर्ज भरलेला नव्हता अशातच शिवसेनेला खिंडीत गाठून महिलेची जागा देऊ केली परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी या बाजार समितीला भरलेले सर्व अर्ज माघारी घेऊन या निवडणुकी पासून अलिप्त आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत मतदार संघात आघाडीत बिघाडीचा फायदा शिंदे गटाला ?
शिवसेनेच्या मतांचा ग्रामपंचायत मतदार संघावर परिणाम होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे ग्रामपंचायत मतदार संघामध्ये चार जागा असून यापैकी दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी होत्या या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी साठी सोडल्या तर भाजपा शिवसेनेने खुल्या जागेवर भाजपाचे दिलीप कटके यांना संधी दिली आहे.
तर शिवसेनेने ही खेळी करून एक जागा ओबीसीसाठी भारत मोरे यांच्या रूपाने सोडली आहे. यामुळे या मतदार संघात क्रॉस वोटिंग ची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. भाजपाकडून दिलीप कटके यांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारा समोर एक तगडे आव्हान असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये उमटत आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातील निवडणुकी अटीतटीचे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत या शिवसेना भाजपने आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यात मोठे यश संपादन केले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मतदान हे ग्रामपंचायत मतदार संघासाठी निर्णय ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना भाजप वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायती - परिंचे, बेलसर, खळद, पिंपरी, कोडीत बुद्रुक, पिसर्वे, वाळूंज, टेकवडी, गुरोळी, केतकावळे, सोनोरी, धालेवाडी, हरगुडे, हरणी झेंडेवाडी, थापे-वारवडी जवळार्जुन, साकुर्डे, गराडे, दिवे, नाझरे कप, काळदरी, कोळविहीरे, वाळुंज, पिसर्वे, सुपे खुर्द, चांबळी, कोडीत खुर्द, आस्करवाडी वाघदरवाडी आडाचीवाडी, भिवरी,
महाविकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायती
सोमुर्डी, रीसे, आंबोडी, पारगाव, नारायणपूर, पिसुर्टी, निरा, पोंढे, कुंभारवळण, तोंडल, पांडेश्वर, पिंपरे खुर्द, मावडी सुपे, वाघापूर, पिंंपळे, राजेवाडी, दौंडज, निळूंज, बोराळवाडी, राख, आंबळे, हिवरे, शिवरी, भिवडी, मांडकी, सटलवाडी, वाल्हे
----------
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्याचबरोबर आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे नाव कोणत्याही पत्रकावर व कोणत्याही सभेत वापरू नये. त्याचबरोबर राष्ट्रवादी व काँग्रेसची दादागिरी खपून घेतली जाणार नाही.
अभिजीत जगताप
तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट