मेढा ! ओंकार साखरे ! जावली-महाबळेश्वर बाजार समितीच्या मतदानाची तयारी पूर्ण : ११ मतदान केंद्रे, २२ उमेदवारांचे भवितव्य होणार मतपेटी बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- - 
मेढा : प्रतिनिधी
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून दि. २८ रोजी मतदान व दि. २९ रोजी मतदान मोजणी मेढा येथे होणार असल्याची माहिती निवडूक अधिकारी नानासाहेब रूपवनवर यांनी दिली. बाजार समितीच्या १२ जागेसाठी २२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे असून शेतकरी पॅनल विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे. मात्र काहींनी हट्टाहास धरण्याने अखेर निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.
          जावली महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी करण्यात आली असून जावली तालुक्यासाठी मेढा येथे दोन व कुडाळ येथे तीन मतदान केंद्रे देण्यात आली असून महाबळेश्वर तालुक्यासाठी महाबळेश्वर मध्ये तीन, तापोका दोन आणि कुंभरोशी येथे एक मतदान केंद्रे देण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत ३ क्षेत्रीय अधिकारी, ५५ कर्मचारी, १३ पोलीस कर्मचारी, २० राखीव कर्मचारी सहभागी होणार आहेत. 
            बाजार समितीसाठी दि. २८ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सायं. ५ वाजेपर्यत मतदारांना मतदान करण्याची वेळ देण्यात आली असून दि. २९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासुन बाबासाहेब आखाडकर सभागृहात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सोसायटी मतदार संघासाठी ६८४ , ग्रामपंचायत मतदार संघासाठी १३३० तर व्यापारी अडत मतदार संघासाठी ३०८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
               जावली महाबळेश्वर बाजार समितीची निवडणूक निवडणूक निरक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जिवन गलांडे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक निरीक्षक तथा नायब तहसिलदार संजय बैलकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब रूपवनवर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख हे काम पहाणार आहेत.
To Top