सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भाटघर धरण ता.भोर येथील बसरापूर गावचे हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस बॅक वॉटरला दोन मुले पोहण्यासाठी गेली असता त्यातील एक रुद्र राहुल शलींदर( वय-१७) सध्या रा.भोलावडे ता.भोर मूळ रा.साफ्रज खडकी पुणे हा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.तालुक्यात चार दिवसात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यूची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रूद्र हा त्याचा रविराज गणेश चव्हाण (वय -११) याच्यासोबत पोहण्यासाठी गेला होता.यावेळी त्यातील रुद्र राहुल शलींदर पोहताना पाण्यात बुडला असून शोध कार्य सुरू आहे.घटनास्थळी भोईआळी येथील तरुण,बसरापूर पोलीस पाटील व भोर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार विकास लगस, उद्धव गायकवाड, दत्तात्रय खेंगरे पाण्यात बुडालेल्या रुद्रचा शोध घेत आहेत.