जावली ! गाव तिथे 'पिंपळबन' उपक्रम राज्यस्तरावर राबविण्यास सहकार्य करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून कुडाळ येथे साकारत असलेल्या 'आपलं पिंपळबन' उपक्रमाचे कौतुक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावली तालुक्यातील कुडाळ येथे साकारत असलेल्या आपलं पिंपळबन या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत हा उपक्रम राज्यस्तरावर राबविण्यासाठी सहकार्य करू व लोकसहभागातून सुरू असलेल्या पिंपळबनच्या या जावळी पॅटर्नची गरज निश्चितच संपूर्ण राज्याला आहे ,त्यास सहकार्य मिळेल.असे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी आपलं पिंपळबन च्या सदस्यांना सांगितले
          आपल्या जन्मगावी दरे येथील दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता पिंपळबनच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली व राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी निवेदन दिले,यावेळी कुडाळ गावातील विविध विकास कामासाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी कुडाळ येथील पिंपळबन समितीचे अध्यक्ष महेश पवार ,कुडाळ गावचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे ,उपसरपंच सोमनाथ कदम तसेच सदस्य विशाल मदने व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाव तिथे पिंपळबन ही संकल्पना राबवण्यासाठी तसेच ही योजना शासनाने दत्तक योजना म्हणून जाहीर करावी . व देशी झाडांचे वृक्षारोपण व संगोपन या कामासाठी गावोगावी विविध फंड  उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या 
     यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले  ही योजना खरोखर निसर्गाच्या दृष्टीने व मानवी जीवनाच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगून ही योजना संपूर्ण राज्यस्तरावर कशी राबवता येईल याचा नियोजित आराखडा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर करण्याविषयी  सूचना केल्या.तसेच कुडाळ येथील पुलस्ती मंदिर ते सातारा मार्ग रस्ता व  संरक्षण भिंत, बोडरे वस्ती येथे संरक्षण भिंत , ब्राह्मण शाही  संरक्षक भिंत पिण्याच्या पाण्याच्या विहिरी शेजारी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा विविध विकासकामांच्या संदर्भात विकास निधी उपलब्ध करण्याची यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली.
To Top