सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
नसरापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे बनेश्वर मंदिरातील जल कुंडामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी कासवाची संख्या वाढली होती.जल कुंडामध्ये जागा अपुरी असल्यामुळे कासवांना मोकळा श्वास घेता येत नव्हता.वारंवार विदेशी कासवे देशी कासवांवर हल्ला करून त्यांना जखमी करत असे व त्यांना इन्फेक्शन होऊन देशी कासव प्रजातीस धोका निर्माण होत होता.याची दखल घेवून संघटनांनी बचाव कार्य करीत देशी कासवांना या कुंडातून बाजूला काढल्याने देशी कासवांनी घेतला विदेशी कासवांपासून मोकळा श्वास. नसरापूर वनपरिमंडळ अधिकारी नितीन खताळ व पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असो.चे अध्यक्ष सुशील विभुते यांनी पुढाकार घेतल्याने उपविभागीय वनाधिकारी आशा भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, वनरक्षक बी. एस. तांबे , नवनाथ पगडे, संध्या कांबळे, अर्चना कोरके, अश्विनी देशमुख , तसेच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्पमित्र विशाल शिंदे, सोनू खेडेकर, विनायक मोहिते, सनी कडके, संतोष पाटील, विलास धोंगडे व बावधन रेस्क्यू टीमचे डॉ. निकिता मेहता, सोनेश इंगोले,श्रीनाथ चव्हाण,शुभम सिंग, अमित तोडकर तसेच पशूधन विकास अधिकारी एस.एस.प्रधान. बनेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे नवनाथ शिर्के यांनी जलकुंडातील सर्व कासव सुखरूप बाहेर काडून उपचारासाठी बावधन या ठिकाणी पाठविले. देशी ३३ व विदेशी ६३ एवढी संख्या आहे यांच्यावर योग्य उपचार झाल्यावर त्यांना निसर्गात मुक्त करण्यात येणार आहेत.