Purandare Big Breaking ! सासवड नजीक झेंडेवाडी येथे बस व दुचाकीची धडक ! धडकेत बस पलटी तर एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

Admin
2 minute read
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली आहे. यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे .
        झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ टू व्हीलर आणि एसटी बसचा हा अपघात झालाय. यामध्ये  राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली असून एस टी महामंडळाची ही  बस  पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने टू व्हीलर चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी ही बस देखील पलटी झाली आहे. बसमधील प्रवाशांना  बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आले आहे. सासवड पोलिसही घटनास्थळी दाखल झालेत.बसमध्ये २९ प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 
To Top