सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती पंचायत समितीचे माजी सभापती व उपसभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊलीभाऊ शंकरराव कदम रा. मुरूम (ता. बारामती यांचे शनिवार (दि.८) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात् पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे ते कट्टर समर्थक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाने सोमेश्वर परीसरात शोककळा पसरली आहे. अत्यंसंस्कार रविवार (दि.९) रोजी सकाळी ८ वाजता मुरुम येथे होणार आहेत.