भोर ! पाले वि.का. सोसायटीच्या अध्यक्षपदी एकनाथ वरे तर उपाध्यक्षपदी विष्णू भिलारे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
      भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पाले ता.भोर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी एकनाथ भिवा वरे तर व्हा.चेअरमनपदी विष्णू दिनकर भिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती संगीता मुंबरकर यांनी काम पाहिले.
     पाले विकास सेवा सोसायटी वरवडी डाय.,वरवडी खुर्द ,वरवडी बुद्रुक तसेच पाले या चार गावांची मिळून असून सोसायटीचे संचालक १२ आहेत.चेअरमनपदी वरे व व्हा.चेअरमनपदी भिलारे यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातून तसेच वीसगाव खोऱ्यातील पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी अनंता तुपे ,अशोक भिलारे ,संपत भोसले, नामदेव खोपडे ,हनुमंत भोसले, गुलाब वरे, बाळू भिलारे, चंद्रकांत भोसले ,राजाराम तुपे, काशिनाथ पोळ, दिगंबर पालकर,आनंदा शेलार ,सचिव सुनील गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top