भोर ! संतोष म्हस्के ! चिकनचे दर निम्म्यावर....! भोरला पोल्ट्री व्यवसाय अडचणीत : किलोला १२० भाव, खवय्यांची चंगळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
बाजारात बॉयलर कोंबड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने एक वर्षाच्या कालावधीनंतर चिकनचा भाव निम्म्याने वधारला.परिणामी खवय्यांची चंगळ झाली असली तरी भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा फटका बसला असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ंं
     मागील एक ते दोन वर्ष चिकन बॉयलर कोंबड्यांच्या चिकनला १८० ते २०० रुपये प्रतिकिलो कायम भाव होता.मात्र मागील आठवड्यापासून भाव निम्म्याने वधारला असल्याने चिकन प्रतिकिलो १२० रुपये झाले आहे.यामुळे शेकडो पोल्ट्री व्यवसायिक तसेच चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

भोरला पोल्ट्री व्यवसायीक हवालदिल
     उष्माघाताने बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडू लागल्याने तोटा होत होता.त्यातच मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत बॉयलर कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने चिकनचा प्रति किलोचा भाव निम्म्याने वधारला गेला आहे.याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायिकांवर झाला असून पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा आर्थिक विवंचनेत सापडला गेला असल्याने हवालदिल झाला असल्याचे खानापूर ता.भोर येथील पोल्ट्री व्यवसायिक नवनाथ तनपुरे यांनी सांगितले.
To Top