पुरंदर ! विजय लकडे ! तालुक्यात दोघांना कोरोनाची लागण : आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी             
पुरंदर तालुक्यातील मांडकी गावात एक महिला तर सासवड नगरपरिषद हद्दीत एक पुरुष असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.    
               नीरा वाल्हे जेऊर व मांडकी परिसरात सर्दीताप व खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.  
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भागवत भिसे यांनी याबाबत माहिती दिली. सर्दी खोकल्याची लक्षणे दिसतात नागरिकांनी वेळी सावध  होऊन वैद्यकीय उपचार करून घ्यावेत असे निरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक बापू भंडलकर यांनी सांगितले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत घरोघरी 
जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
              तालुक्यात मांडकी गावात एक ,सासवड नगर परिषद हद्दीत एक असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.
To Top