सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद ता. खंडाळा येथे रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बॉम्ब सदृश स्फोटके(गोळे) खाल्ल्याने एका डुकराचा मृत्यू झाला आहे. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
लोणंद शहारार रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीने डुकरे मारण्यासाठी चेंडूच्या आकाराचे गावठी बॉम्ब सदृश्य गोळे परिसरात टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता सदरील स्फोटके खाल्ल्याने एका डुकराच्या जागेवरच मृत्यू झाला आहे.यामुळे परिसरात मोठा आवाज झाला आहे. या घटनेनंतर पोलीस व पदाधिकारी घटनास्थळी हजर झाले आहेत.