सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
खंडोबाचीवाडी येथे हर हर महादेव कावड तरुण मंडळ व पी एस आय ब्लड बँक पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुरुषानं सोबत स्त्रियांनी देखील रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांनी हेडफोन भेट दिले.
या शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे ग्रामपंचायत खंडोबाची वाडी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले .
यामध्ये 51 बाटल्या रक्त संकलित करून गावातील तरुणांनी एकत्र येत पहिल्यांदाच एक आगळा वेगळा उपक्रम राबवला.
खंडोबाची वाडी ते हरणी गावापर्यंत ही कावड यात्रा काढली जाते. कावड यात्रेचे हे आठवे वर्ष आहे. रक्तदान शिबिरानंतर हरिभक्त पंडित श्री संजय महाराज वेळूकर सातारा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे सायंकाळी आठ वाजता महाआरती व महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
खंडोबाची वाडी येथे पहिल्यांदाच तरुणांनी एकत्र येत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यामुळे गावातील जेष्ठ ग्रामस्थांनी तरुणांचे विशेष कौतुक केले.