भोर ! महामार्ग पत्रकार हा जीवाची परवा न करता कर्तव्य बजावणारा : आ. भीमराव तापकीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हके
 समाजासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधनात्मक व लोकाभिमुख लेखन करून आपली सामाजिक कर्तव्य उत्कृष्टरित्या बजावणारे महामार्ग पत्रकार संघ भोर- हवेलीचे पत्रकार असल्याने संघाचे काम उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन आमदार भीमराव तापकीर यांनी केले.
      महामार्ग पत्रकार संघ भोर-हवेली च्या प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण आयोजित गुरुवार दि.२० कार्यक्रमात आमदार तापकीर बोलत होते.यावेळी पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत ३५ गोर- गरीब कुटुंबीयांना सीधावाटप ,२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तर १६ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला.कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प. सचिन महाराज पवार, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी धंनजय पाटील, रमेश कोंडे,अमोल पांगारे, पत्रकार संघाचे पदाधिकारी महेंद्र शिंदे,किरण दिघे, राहुल पांगारे, दत्तात्रय शिंदे,रामनाथ शिंदे ,अविनाश गोगावले, सोमनाथ पांगारे ,विठ्ठल पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top