सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महूडे खोऱ्यातील शिंद ता. भोर येथील पदवीधर असणारा तरुण निशिकांत संभाजी मोहिते (वय-२५ ) नांदशिवार (घागुरजार्ई) नीरा नदी पात्रात पोहताना दम न छाटल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.२४ रोजी घडली. घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शिंद-महुडे परिसरात शोककळा पसरली आहे.
निशिकांत हा घरातीलच चार मध्यम वयाच्या मुलांसह नांदशिवार(घागुरजाई) येथे असलेल्या नीरा नदी पात्रात पोहोण्यासाठी गेला होता.पोहताना दम छाटला नसल्याने निशिकांत पाण्यात बुडाला.यावेळी बाकी चार पोहोणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारील शेतात काम करणाऱ्या एका तरुणाने पाण्यात बुडालेल्या निशिकांतला पाण्याबाहेर काढले व गावातील तरुणांच्या साह्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच निशिकांतचा मृत्यू झाल्याचे सांगितले.