सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर येथील माजी आदर्श सरपंच तसेच राजगड ज्ञानपीठाचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर ता.भोर येथील प्रा.चंद्रकांत नांगरे यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा संघटनेची त्रैवार्षिक सभा पुणे येथील फरगुशन कॉलेजमध्ये संपन्न झाली.या सभेत नवीन कार्यकारणी निवडून विविध पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली.यात संघटन कौशल्य व संघटना वाढीसाठी कायमच प्रयत्नशील असणारे प्रा.चंद्रकांत तुकाराम नांगरे उपाध्यक्ष ,अध्यक्ष प्रा.लक्ष्मण रोडे तर सरचिटणीस म्हणून प्रा.विक्रम काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी महासंघ माजी अध्यक्ष प्रा.पंडित पाटील,माजी सरचिटणीस एस.टी.पवार,जिल्हा संघटना अध्यक्ष प्रा. संतोष फाजगे,भोर तालुका संघटना अध्यक्ष सोमनाथ सोडमिसे,सचिव प्रा.सलीम शिकलगार,प्रा.दत्तात्रय शिंदे,प्रा.धनंजय लंबाते, प्रा.नागनाथ देशमुख,प्रा.सुनील बोडके, प्रा.तानाजी लवटे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.