सोमेश्वर रिपोर्टर टिम---------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावली व महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवण्याचे उत्तुंग कार्य कोयना एज्युकेशन सोसायटीने केले आहे असे प्रतिपादन उद्योजक सागर कौशक यांनी केले.
जावली येथील क्रांती विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी कौशक बोलत होते. यावेळी कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी संतोष सपकाळ, दिलीप ठाकूर, दत्तात्रय राठोडे, शंकर सपकाळ, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिल्या निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कौशक पुढे म्हणाले ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिकला तर समाजाची उन्नती होऊ शकेल स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी टिकून राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी आपल्या माध्यमातून या विद्यालयात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.
किसन जाधव म्हणाले आमच्या सर्व शाळा अतिदुर्ग भागामध्ये असून सेवा हेच व्रत घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या अंगी शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत केल्यास विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
संस्थेचे सचिव डी. के .जाधव म्हणाले स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकून राहण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन आजच्या युगात विद्यार्थी टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात.
संतोष सपकाळ यांनी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे व अर्जुन गोळे यांनी दिलेल्या वॉटर कुलरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष फळणे गुरुजी, संचालक बी. व्ही. शेलार, धोंडीबा जंगम, बाळकृष्ण जंगम, सावलीचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ, गवडी चे सरपंच राजू खुडे, चोरबेचे सरपंच विजय सपकाळ, मामुर्डी गावचे सरपंच जगन्नाथ धनावडे, दिवदेव चे सरपंच जंगम गुरुजी, उपसरपंच बाबुराव भिलारे, आनंदराव मस्कर, संतु मस्कर, विजय जुनघरे, वसंत मस्कर, चेअरमन विनोद जुनघरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जंगम यांनी केले उपस्थिताचे आभार हणमंत निकम यांनी मानले.