सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथील पालखीतळाची पुरंदरचे प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी मंगळवारी दि.२५ रोजी पाहणी करून आढावा घेतला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून रोजी पुणे आळंदी येथून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे दि १५ ते १८ जून पर्यंत पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातच असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकताच पदभार स्वीकारलेले प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी तसेच पालखी सोहळा मुक्काम विसावा या ठिकाणची प्रत्यक्षात पाहणी करून अडचणी व समस्याचा आढावा घेतला.
यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार रूपाली सरनोबत आरोग्य अधिकारी विक्रम काळे एपीआय नंदकुमार सोनवलकर उपसरपंच राजेश काकडे ग्रा प. सदस्य अनिल चव्हाण प्रमोद काकडे ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील मंडल अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालखी तळाला संरक्षक भिंत कॉंक्रिटीकरण. व मेन गेट बसवण्यात यावे अशी मागणी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केली.
तर पिसुर्डी ते निरापर्यंतचा अरुंद रस्ता. साईड पट्ट्या व रस्त्यातच खड्ड्याचे साम्राज्य यामुळे धोकादायक बनत चाललेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी केली