बारामती ! कारखान्यांनी हार्वेस्टरसाठी बिनव्याजी कर्ज दिले तर ऊसदर कमी घेण्याची सभासदांची तयारी आहे का? अजित पवारांचा सवाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
हार्वेस्टर घेण्यासाठी कारखान्यांनी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले तर उसाचा दर कमी घेण्याची सभासदांची तयारी आहे का? असा सवाल करून हार्वेस्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज कारखान्याने का भरावे असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. 
            वाणेवाडी ता. बारामती येथे सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले यांच्या मातोश्री सुमन भोसले यांचे नुकतेच निधन झाले आहे. भोसले कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी पवार बोलत होते. यावेळी सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मा. अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक रणजित निंबाळकर, रविराज तावरे, सुनील भोसले, विक्रम भोसले, दिग्विजय जगताप, पोपटराव भोसले, सोमनाथ होळकर, बाबासाहेब भोसले, नितीन भोसले, उत्तमराव भोसले आदी उपस्थित होते. पवार यावेळी भोसले कुटुंबीयांची विचारपूस करत सद्या ऊस किती आहे. ठिबक आहे का, दूध व्यवसाय आहे का, अशा प्रकारची चौकशी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सद्या दूध व्यवसायाला चांगले दिवस आहेत. केंद्राने दूध आयात करू नये म्हणून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. कोणताही व्यवसाय करताना त्याचे अनुदान मिळणार आहे हे गृहीत धरून तो व्यवसाय करू नका. हार्वेस्टर बाबत बोलताना ते म्हणाले, ज्या दिवशी अनुदानाचा आदेश निघाला आहे त्याच दिवसापासून पुढच्याना अनुदानात सवलत मिळणार असल्याचे पवार यांना सांगितले.
To Top