सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - प्रतिनिधी
जावलीचे माजी सभापती हभप सुहासदादा गिरी यांच्या मातोश्री तसेच माजी सभापती सौ. जयश्रीताई गिरी यांच्या सासुबाई हभप हिराबाई शिव गिरी ( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
सांप्रदायिक संस्कारातील असलेल्या हभप हिराबाई गिरी या थोरल्या आई म्हणून परिचित होत्या. हिराबाई गिरी यांच्या जाण्याने सांप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असून गिरी कुटुंब गलबलून गेले आहे.
महिगाव ता. जावली येथील गिरी कुटुंब म्हणजे सांप्रदायिक क्षेत्रातील सुसंस्कारांचे दालन. अवघ कुटुंब श्रद्धा व भक्तीने ओतप्रोत भरलेले. या कुटुंबाची 'थोरली आई' या नात्याने हिराबाई गिरी यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलली होती. अत्यंत शांत व संयमी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. घराण्याला असलेला सामाजिक वारसा जतन करण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळमुळे एका जागी खिळून होत्या. शनिवारी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे महिगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. माजी सभापती सुहासदादा गिरी, वैभव गिरी यांच्या त्या आई तर माजी सभापती जयश्री गिरी यांच्या त्या सासू होत.
हिराबाई गिरी यांच्या जाण्याने अवघा परिसर हेलावून गेला आहे. थोरली आई या नात्याने त्यांनी अनेक माणसे जोडली होती. सारा परिसर त्यांच्या आठवणींनी व्याकुळ झाला आहे.