सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात सद्या बहुतांशी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहमधून ज्ञानेश्वरी पारायनात हरिपाठ, काकड आरती, कीर्तन ,प्रवचन, भजन, जागरण ओव्या ,व्याख्याने आदींच्या माध्यमातून वेगवेगळे विषय समाजापुढे मांडले जात असून चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरी पारायण मधून सामाजिक प्रबोधनाचा जागर होत असल्याचे मत ह.भ.प भक्तीमहाराज चव्हाण(पुणे) यांनी केले.
नेरे ता.भोर येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रामदैवताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शनिवार दि.२९ कीर्तनरुपी सेवेत ह.भ.प चव्हाण यांनी सांगितले.पारायणी वैचारिक संमेलने ठरतात. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात.समाजामध्ये एकात्मता टिकून ठेवण्याचा प्रयत्न पारायण सोहळ्यांमधून होत असतो. समाजामध्ये निर्माण झालेले हेवेदावे एकमेकांबद्दल असणारे द्वेष भावना दूर होऊन समाज एकसंघ राहण्यास पारायण सोहळे उपयोगी ठरतात असेही चव्हाण यांनी सांगितले.यावेळी मेरे ग्रामस्थ महिला तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS