कळकराय सुळक्यावरून महाराष्ट्र देशास प्रणाम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा १५० फुटी कळकराय सुळका टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत राकट कणखर दगडांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र देशास प्रणाम केला. महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून आणि कामगारांच्या कार्यास सलाम करून तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

या मोहिमेची सुरुवात जांभवली गाव, ता.मावळ, जि.पुणे येथुन झाली. दिड तासांची पायपीट केल्यावर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचता येते.

पहिला ९० अंशातील सरळसोट कातळ टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारून उजव्या हाताला गेल्यावर एक अंगावर येणारा टप्पा मोठ्या चिकाटीने पार करावा लागतो. ९० अंशातील शेवटचा २० फुटी कातळ टप्पा पार करून शिखर गाठता येते.
१५० फुटी सरळसोट कठीण चढाई आणि त्यानंतर रॅपलिंगचा थरार, उष्णतेची लाट, पाण्याची प्रचंड कमतरता असणारे ठिकाण अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या बनी शिंदे, जॅकी साळुंके, राजश्री चौधरी, भारत वडमारे, यश पवार, संकेत जाधव, विजय मेटकरी, राहुल भालेकर, विशाल गोपाळे, निखिल अंजनवाड, सुजाता थोरात, ज्ञानेश तांदळे, भारत खेडेकर, ध्रुवी हर्षदा गणेश पडवळ (वय १०वर्ष) आणि डॉ समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते केली.
To Top