भोर ! संतोष म्हस्के ! धरणांचा पाणीसाठा झपाट्याने तळ गाठतोय : उन्हाचा चढत्या पाऱ्याचा परिणाम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-- -- 
भोर : प्रतिनिधी
उन्हाच्या चढत्या पाऱ्याने होणारे बाष्पीभवन तसेच पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या वीसर्गामुळे तालुक्यातील भाटघर,नीरा - देवघर तसेच वीर या तीनही धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने तळ घाटू लागला आहे.परिणामी या धरणांतील पाण्यावर अवलंबून असणारे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील उन्हाळी पिकांना पुढील काळात लागणारे पाणी मिळणार की नाही याची शेतकऱ्यांना शास्वती नाही.
      निरा-देवघर ,भाटघर तसेच वीर धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरली होती. या तीनही धरणांमधून विसर्गातून पूर्वेकडील भागातील बारामती ,इंदापूर, फलटण येथील शेतकऱ्यांच्या शेतीला वर्षभर पाणीपुरवठा केला जातो.यंदा वेळोवेळी तीनही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तसेच अति उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी कमी होत चालला आहे.सद्या भाटघर -२३ %, निरा- देवघर -३९ % ,वीर - ४९% तर वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणात ३८ % पाणीसाठा उरला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला असल्याचे चित्र आहे.
To Top