ग्रामीण भागातील अनेक उद्योजक हे खादी व ग्रामोद्योग विभागामुळे घडले : चंद्रकांत पाटील

Admin
2 minute read
पुणे : प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कारागिरांच्या कलांचे संवर्धन व्हावे यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ विविध उपक्रम व योजना राबवित आहे हे कौतुकास्पद आहे असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.
         पुणे शिवाजीनगर येथील हातकागद संस्था यांच्या परिसरात राज्यस्तरीय मातीकलेच्या व विविध ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शन खादी व ग्रामोद्योग मंडळाने आयोजित केले आहे या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री पाटील बोलत होते यावेळी मंडळाचे सभापती रवींद्र साठे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमास उद्योजक श्रीकांत बडवे, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, विद्यासागर हिरमुखे, बिपीन जगताप, नित्यानंद पाटील, अमर राऊत आदी उपस्थित होते. 
पाटील पुढे म्हणाले " ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक उद्योजक खादी व ग्रामोद्योग विभागामुळे घडले आहे. पारंपरिक उद्योगाच्या माध्यमातून आपली कला आणि उद्योग जपण्याचे कार्य मंडळ करीत आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या संस्थानी जास्तीत जास्त लोकापर्यंत योजना पोहचवाव्यात आणि लोकांना सक्षम करावे" 
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजिक माती कलेला प्राधान्य देण्यासाठी भरवलेले हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. कुंभार कला वाचवायचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.
मंडळाचे सभापती रवींद्र साठे अध्यक्षीय भाषणात म्हणाले खादी मंडळ ग्रामीण भागातील सर्व राज्यातील पारंपरिक कुटीर उद्योग वाचवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवीत आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत करून रोजगार निर्मितीत भर घालत आहे. माती कलेला समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मंडळाचे ग्रामोद्योग या मासिकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नित्यानंद पाटील, सूत्रसंचालन उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी तर आभार रमेश सुरूंग यांनी मानले.
To Top