सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद ते नीरा रस्त्यावर लोणंदपासून दोन किलोमीटरवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (MH 14 BT 2848 ) व नीरेकडून लोणंदला निघालेली मोटरसायकल (एमएच 12 आरव्ही 3158 यांच्यात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार धडक झाली.
यामध्ये मोटारसायकलवरील ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे ता. पुरंदर) हे तीनही युवक जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे बु॥, थोपटेवाडी येथील आहेत. या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली.
COMMENTS