सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कृषी उत्पन्न बाजार समिती भोरच्या निवडणुकीत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना ,भाजपा यांच्याकडून ८६ नामनिर्देशन पत्र भरण्यात आले होते. बुधवार दि.५ रोजी छाननीत ७२ अर्ज वैद्य ठरले तर १४ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैद्य ठरलेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंढरीनाथ घुगे यांनी दिली.
भोर तालुक्यात अनेक वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असून निवडणुकीत चारही पक्षांनी दंड थोपटले आहेत.२० एप्रिल माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने या दिवशी खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.यात कृषी सहकारी पतसंस्था सर्वसाधारण -३१, महिला राखीव-६, मागास प्रवर्ग -६, भटक्या जाती - ५, ग्रामपंचायत सर्वसाधारण ११, अनुसूचित जाती जमाती -४ , अनुज्ञाधारक व्यापारी व आडते- ३, हमाल तोलारी -१ , आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक - ४ अशा एकूण ७२ उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत.