जावली ! सातारा जिल्ह्याने प्रेम दिले... मी वाढपी म्हणून निधी कमी पडून दिला नाही : अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारा हा सातारा जिल्हा आहे. सुरुवातीच्या काळात जिल्हाने दोन खासदार आणि नऊ आमदार दिले. त्यानंतर एक खासदार आणि तीन आमदारावर आलेला आहे. याच आत्मचिंतन सगळ्यांनी केल पाहीजे असे सांगुन मी ईथे निधी दिला तो बापू तुमच्याकडे बघून दिला. राष्ट्रवादीवर प्रेम करणारा जिल्हा एखाद्या वेळेस कुठेतरी चुकला म्हणून  मी मंत्री असताना कसलाही निधी कमी पडून दिला नाही. माझ्या कडे वाढण्याचा अधिकार होता आणि कुठ तरी वाढण्याच काम कमी कराव हे मनाला पटत नव्हत. सैनिक स्कूल असो कि मेडीकल कॉलेज असो कि महाबळेश्वर तापोळा पर्याटण विकास असो निधी देत गेलो कधीही दुजाभाव केला नाही असे विरोधी पक्षनेते आ. अजित दादा पवार यांनी सांगीतले. 
           मेढा, ता. जावळी येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार, श्रीनिवास पाटील, माजी सहकार  मंत्री बाळासाहेब पाटील,  आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सारंग पाटील, माजी  जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जिल्हा अध्यक्ष सुनील माने, युवक सरचिटणीस तेजस शिंदे, रुपालीताई भिसे, रधिकाताई हांकारे , वैभव शिंदे, बाळासाहेब सोलस्कर, बाबुराव सपकाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
         यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातार्याची राज्यात ओळख आहे. लोकांच्या मध्ये मिसळा  त्याच्या कामांना प्राधान्य द्या, हा बालेकिल्ला अभेद ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे. कोण कितीही मोठ्या असला तरी भिण्याचे कारण नाही. कार्यकत्यांनी आपले काम प्रामाणिक करावे. अमित आणि माझ्यात नेहमीच आपलेपणाची भावना होती. तो प्रवाहातून थोडा दूर झाला होता. त्याचा पक्ष प्रवेश नव्हे तर घरवापसी झाली आहे. नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्या येण्याने आनंद झाला असून त्यांने आपली उपयुक्तता त्याने  सिद्ध करावी मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
          यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस  कायमच सर्वसामान्य जनेतेच्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर  आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या दाखविलेल्या रस्त्याने जाऊयात, यातून निश्चितपणे आपल्याला दिशा मिळणार आहे.  महाविकास आघडीने कोरोना काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच विकासाचा रथ यशस्वी रीत्या हाकला आहे. आपल्यात कोणतीही दुफळी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे असे ही म्हणाले. 
            पवार पुढे म्हणाले विरोधकांनी उंचीवर जावु नका आज मात्र त्याच उंचीच्या निमित्ताने राजकारणात मोठी उंची गाठलेल्या आर आर आबा, लालबहदुर शास्त्री यांच्या कामाची प्रशंसा होत असते. 
           यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले अमितची घर वापसी झाल्याने नक्कीच जावळी तालुका राष्ट्रवादीमय होणारच याकरिता अमित, मी आणि बापू सर्व कार्यकर्त्यांना बळ देऊ आणि निर्माण झालेली पोकळी निश्चित भरून काढू असे सांगीतले.
           यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी राजकीय टोलेबाजी करीत म्हणाले की, कोणालाही पक्षात घ्या. मात्र दोन्ही राजे पुन्हा पक्षात आले तर मात्र मी पक्षातून बाहेर असे जाहीरपणे सांगीतले. 
             यावेळी माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती अमित कदम म्हणले पक्षात असताना वारंवर काही राजकीय मंडळींकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने चुकीची भावना झाली होती. परंतु घरवापासी झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे मी कधीही राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही. कोणत्याही अमिषाशिवाय राष्ट्रवादी मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे असे अमित कदम यांनी सांगीतले. ते पूढे म्हणाले माझ्या उंचीवरून विरोधकांनी अनेकदा अवेहलाना केली आहे. काही जण असली बेताल वक्तव्ये करून टाळ्या वाजून घेण्यात धन्यता मानतात. ते फारसे मनाला लाऊन घेण्याची आवश्यकता नाही. त्याचा विकासाशी काही संबंध नाही असेही अमित कदम यांनी सांगितले.
            दरम्यान मोरावळे येथुन राष्ट्रवादी युवकांनी भव्य दोन चाकी रॅली काढून जवळवाडी येथुन बाजार चौकापर्यत आ. अजितदादा पवार यांची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शेतकरी मेळाव्यास तुफान गर्दी झालेली दिसुन आली. पुढील आमदार हा राष्ट्रवादीचाच अशा घोषणा कार्यकर्त्यांतुन देण्यात येत होत्या. या मेळाव्यातून राष्ट्रवादी कडून आमदारकी साठी अमित कदमांची प्रचार सभा असल्या सारखी सभा असल्याचे चित्र दिसुन येत होते. 

मेढा: येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार शेजारी श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आदी मान्यवर ( सोमनाथ साखरे )
To Top