भोर ! भोर,महाड पोलिसांच्या सतर्कतेने वरंधा घाटात भरकटलेले कुटुंब सापडले : वादळ वाऱ्याच्या भीतीने कुटुंबाला लागला प्रवासाला वेळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील आंबवडे येथील जेथे कुटुंबीय चारचाकी वाहनाने वरंधा घाटमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी शनिवार दि.८ दुपारच्या दरम्यान निघाले.मात्र अवकाळी पावसाच्या वादळ-वाऱ्यामुळे जेधे कुटुंबीयांना महाडपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला तर गाडीतील पाच जणांचे फोन नॉटरीचेबल लागल्याने आंबवडे येथील घरच्या लोकांची धांदलच उडाली.
    राजेंद्र माणिकराव जेधे हे आपल्या कुटुंबतील ५ जण स्वतःच्या चार चाकी गाडीने वरंधा घाटमार्गे मुंबईला जाण्यासाठी प्रवास करत असताना भरकटले असल्याची माहिती तात्काळ सोशल मीडियाद्वारे महाड व भोर तालुक्यात पसरली गेली.भोर तसेच महाड पोलिसांनी जेधे कुटुंबियांच्या नातलगांसमवेत संवाद साधून माहिती घेतली.अखेर रात्री एकच्या दरम्यान महाड तालुक्यातील शिवतरघळ येथे हे कुटुंब पाऊस व वादळ वाऱ्याच्या भीतीने एका घरात आसरा घेऊन राहिल्याचे समजले.रात्रीच्या वेळी या भरकटलेल्या कुटुंबीयांशी संपर्क करून आधार देत  सर्वजण सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी आंबोडे येथील घरच्या लोकांना दिली .तर ५ जणांचा फोटो घेवून सोशल मीडियावर व्हायरल केला व सुखरूप असल्याचा मेसेज दिला.आणि याची माहिती आंबवडे येथील राहणाऱ्या घरच्यांना मिळताच सर्वांनी सुस्कारा सोडला.शोध कार्यात भोर पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे,हवालदार उद्धव गायकवाड तसेच महाड पोलीस उपस्थित होते.

To Top