भोर ! अक्षय पवार गोरक्षक पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील उत्रोली येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते अक्षय विठ्ठल पवार यांना बजरंग दल आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त रविवार दि.९  तळेगाव स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात गोरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पवार यांचे तालुक्यातील अभिनंदन होत आहे.
      गोरक्षणासाठी कायमच धडपड करून योग्य नियोजन व उत्तम कामाची पद्धत या पार्श्वभूमीवर पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे श्रेय घडवणारे गुरू मिलिंद एकबोटे ,उपेंद्र बलकवडे ,अभी मुळे तसेच वेळोवेळी सहकार्य करणारे ॲड. मुकादम विजय व ॲड.अजिंक्य मुकादम ,पोलिस,पत्रकार तसेच अहोरात्र गोरक्षण करणाऱ्या  गोरक्षकांचे आहे.असे पवार यांनी सांगितले
To Top