महाविकास आघाडी सरकारच्या काळात वितरण व्यवस्था विस्कळीत ! जनाई-शिरसाईचे पाणी इतरत्र वळवून शेतकऱ्यांवर अन्याय : दिलीप खैरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
दौंड बारामती व पुरंदर या तालुक्यातील दुष्काळी भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना करण्यात आलेली आहे. मात्र अनेक वर्ष या भागाच्या वाट्याचे पाणी इतरत्र वळवून या भागातील शेतकऱ्यांवर अन्यायच करण्यात आलेला आहे असा आरोप पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी केला आहे.
            याबाबत खैरे यांनी पुणे पाटबंधारे विभायाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडकवासला धरण साखळी मधून शेती साठी पाणी वितरण व्यवस्था असून याच पाणी साठ्यातून दौंड बारामती व पुरंदर या तालुक्यातील दुष्काळी भागातील शेती सिंचनासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना करण्यात आलेली आहे. या योजनांमध्ये विज बिल व इतर खर्च या सर्वांमुळे योजना २० वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असूनही या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने घेता येत नव्हते परंतु राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ८१ - १९ या धोरणाप्रमाणे पाणीपट्टी आकारणी करण्याचा निर्णय केला त्या नंतर या भागातील शेतकरी नियमित पाणी पट्टीचे पैसे भरत असून या कालावधीत सन २०१९ चे आधी काही दिवस कालव्यातून या योजनेसाठी कालव्यातून जाताना आणि येताना पाणी देण्याची गरज लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात येत होते परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही पद्धत बंद केल्याने योजनेला आवश्यक पाणी न मिळाल्याने वितरण व्यवस्था विस्कळीत झाली
 योजनांना नियमित पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असतानाही वरवंड तलावाची साठवण क्षमता, मंजूर कोटा याचा विचार न करता Tel to Hed पुढे करून राजकीय दडपणा खाली त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्काच्या पाण्या पासून वंचित ठेवले जात आहे, त्याचा थेट शेती पिकांना फटका बसत असून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पिके जळून गेली आहेत शिवाय तत्कालीन सरकारने योजनेचे वीज बिल वाढवल्याने पाणी दर वाढ झाली त्याचाही फटका या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागला असून शेतकऱ्यांच्या नशिबाने पुन्हा शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर वीज बिल दर पुन्हा कमी केले आहेत त्याची अंमलबजावणी करतानाच योजनेच्या मंजूर कोट्याचे प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून वरवंड तलावाची साठवण क्षमता कमी असल्याने नियमित आवर्तन सुरू करण्याचे आधी या योजनेच्या कोट्यातील पाणी कालवा आवश्यकतेनुसार काही काळ आधी सुरू करून पाणी उपलब्ध करून देण्यात यावे योजनेला आजवर देण्यात आलेल्या पाण्याची आकडेवारी अत्यंत धक्का दायक आहे. वास्तविक अनेक वर्ष या भागाच्या वाट्याचे पाणी इतरत्र वळवून या भागातील शेतकऱ्यांवर अन्यायच करण्यात आलेला आहे तो यापुढे होऊ नये यासाठी आपण योग्य ती खबरदारी घ्याल ही आशा असून या आवर्तन नियोजनात या मागणीचा विचार करण्यात यावा.
To Top