धम्माल...मस्ती ..डान्स आणि जल्लोष..! 'वाणेवाडी'च्या 'होममिनिस्टर' विशाखा परखंदे 'पैठणी'च्या मानकरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमात विशाखा परखंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. 
            क्रांतीनाना मळेगावकर निर्मित होम मिनिस्टर या खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन वाणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये क्रांतीनाना मळेगावकर तसेच सह्याद्री मळेगावकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण करत प्रत्यक्ष महिलांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
यामध्ये तळ्यात-मळ्यात, संगीत खुर्ची, रस्सीखेच, फुगे फोडणे तसेच गाणी ओळखा अशा विविध कार्यक्रमासह  विनोदाने भरलेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक हसून हसून
लोटपोट झाले. तर डीजे च्या तालावर अनेक महिलांनी ठेका धरत धम्माल मस्ती तसेच डान्स केला.
 कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत विशाखा परखंदे यांनी वाणेवाडी होम मिनिस्टरचा 'किताब पटकावत पैठणी जिंकली तर धनश्री कोंडे यांनी गॅस शेगडी, कांचन सपकाळ यांनी मिक्सर, आरती गवळी यांनी किचन सेट तर जयश्री कारंडे यांनी किचन ड्राव्हर सेट अशी अनुक्रमे एक ते पाच बक्षीशे मिळवली. 

 कार्यक्रमासाठी नाटक कमितीमधील adv. नवनाथ भोसले, महेश जगताप, इंद्रजित भोसले, तुषार शिंदे, अभिजित चव्हाण, संकेत जगताप व रविराज जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
To Top