सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा-बारामती रस्त्यावर खंडोबाचीवाडी पाटी नजीक एक पीकअप व दुचाकी यांच्यात धडक होऊन एकजण जखमी झाला आहे.सायंकाळी सव्वासहा वाजता हा अपघात घडला.
या अपघातात दिलीप सयाजी मदने वय ४१ रा. खंडोबाचीवाडी ता. बारामती हे जखमी झाले आहेत. त्यांना वाघळवाडी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून वडगाव निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात पाटा तुटलेली पिकअप गाडी पलटी झाली आहे. गाडी रस्त्यावर घासत जात असताना पिकअप च्या मागील बाजूचा धक्का लागून दुचाकीस्वार जखमी झाला आहे. पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.