सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून १८ जागांसाठी तब्बल १४३ जण रिंगणात आहेत. आता अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी किती उमेदवार निवडूक रिंगणातून माघारी घेणार हे २० तारखेला समजणार आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी १४६ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. मनोज मोहन शिंदे यांचा सर्वसाधारण व इतरमागासवर्ग यातून दोन अर्ज बाद झाले. तर दत्तात्रेय आबासो चव्हाण यांचे सर्वसाधारण गटातून एक अर्ज बाद झाला. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी ९९ जण इच्छुक आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात ३३ जण, व्यापारी मतदारसंघातून ८ तर हमाल तोलारीमधून ३ अर्ज अंतिम ठरले आहेत. या होऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार, पुरंदरचे माजी मंत्री विजय़ शिवतारे, दादा जाधवराव, विद्यमान आमदार संजय जगताप आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक एकतर्फी होणार की विरोधी गट जोरदार आव्हान उभे करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.