बारामती बिग ब्रेकिंग ! अजितदादांनी घेतले चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...! साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघासह सर्वच पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
नुकताच बारामती सह बँकेच्या झालेल्या नफ्याची व वसुलीची बातमी आली असताना धक्कादायक बातमी येत असून अध्यक्ष व उपाध्यक्षसह दोन संचालकांनी राजीनामे दिले आहेत. 
         राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे तालुक्यातील साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघांच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
           बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवार यांनी हे राजीनामे का घेतले असावेत, त्यामागे काही कर्जदारांनी तक्रारी केल्या का? संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये झालेला गोंधळ त्याचा हा पडसाद आहे का? अशी शक्यता असेल अशी चर्चा बारामती तुन होताना दिसत आहे, अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळतेय. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बारामती सहकारी बँकेने भरीव कामगिरी करत बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला व बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
To Top