सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
शासनाच्या चूकीच्या धोरणामुळे व अधिसुचनेमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे असे सांगत लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये ग्रामपंचायत प्रवर्गातून स्वाती आदेश जमदाडे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे खंडाळा तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
सहाय्यक निबंधक देविदास मिसाळ,ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला या घटनेमुळे खंडाळा तहसिलदार कार्यालयात व सहाय्यक निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे.