सातारा ! फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची टीका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सातारा : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा हा बालिशपणा आहे. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही. तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. 
         उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस' शब्दाचा वापरल्यावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झाले आहे. सातारा येथे काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेदरम्यान शिवेंद्रराजे माध्यमांशी बोलत होते.
              देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असं बोलत असावेत. फडणवीस यांच्यासारख्या कर्तव्य दक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे अयोग्य आहे. आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध करतो. अशी वक्तव्य थांबवावी अन्यथा, त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ., असा इशाराही शिवेंद्रराजे यांनी दिला.
To Top