सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
दि. ३१ मार्च रोजी ते दि. ०१ एप्रिल रोजी चे दरम्यान लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे. सुखेड ता. खंडाळा गावचे हद्दीतील रिअल ग्रीन फ्लोअर मिल प्रा. लि. या कंपनीच्या ऑफिसचे खिडकीच्या काचा कोणीतरी अनोळखी चोरट्याने काढुन आतमध्ये प्रवेश करुन ऑफिसचे कॅबीनच्या टेबलचे ड्राव्हरचे लॉक तोडुन त्यामधील ९,९१,५००/- रुपये घरफोडी चोरी करुन चोरुन नेली होती. त्याबाबत समीर नुरमहंमद इनामदार यांनी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी दिले तक्रारीवरुन लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर व पोउनि गणेश माने यांनी गुन्हयाचे गांभिर्य ओळखुन सीसीटिव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीचे आधारे माहिती प्राप्त करुन आरोपी निष्पन्न केला. विशाल वायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ लोणंद पोलीस ठाणेचे अंमलदार सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे यांचे खास पथक तयार करुन खाजगी वाहनाने मध्यप्रदेश राज्यातील रिवा या जिल्हयात पाठविले तेथे मध्यप्रदेश मधील रिवा जिल्ह्यातील बैकुंठपुर पोलीस ठाणेचे पोलीसांची मदत घेवुन संशयीत इसम विरेंद्रकुमार रामफल वर्मा वय ३२ वर्षे रा. बेदुहुवा ता. सिरमोर जिल्हा रिवा राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस नेहलेल्या रक्कमेपैकी रोख रक्कम ९,८६,९००/- रुपये जप्त करण्यात आली आहे. नमुद विरेंद्रकुमार रामफल वर्मा यास अटक करून त्यास खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक, ०६/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. गुन्हयाचा तपास श्री गणेश माने व अवधुत धुमाळ हे करीत आहेत.
सदर झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या. लोणंद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक, विशाल के वायकर, गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अमोल पवार, अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेवुन गुन्हा घडले नंतर २४ तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघडकिस आणला आहे. सदर कारवाईत सहभागी वर नमुद लोणंद पोलीस स्टेशनच्या पथकाचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अभिनंदन केले आहे.