phaltan Breaking ! कांद्याला दर मिळेल का नाही माहीत नव्हतं... म्हणून पठ्ठ्याने कांद्याच्या पिकातचं लावली अफूची २७३७ झाडे : पोलिसांनी कारवाई करत तीन लाखांची अफू केली जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
साखरवाडी : गणेश पवार  
मुळीकवाडी ता. फलटण गावाचे हद्दीत बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याचे मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती  पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी शेतात छापा मारला असता  एकुण २७३७ झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करीत असताना मिळुन आला .
        त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या  पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले . त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण २ लाख ७७ हजार २०० रूपयेचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद 
पो कॉ वैभव सावंत यांनी दिली असुन सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पुढील तपास महिला  पीएसआय एसएन पवार करीत आहेत .
To Top