सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - वेल्हा - मुळशी तालुक्यातील पीएमआरडीए संचलित घरकुल योजनेअंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान जमा झाले नव्हते.परिणामी लाभार्थी हवालदिल झाले होते.या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी आयुक्त राहुल महिवाल यांची भेट घेऊन अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी केली.तात्काळ आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहआयुक्त स्नेहल बर्गे यांना सदर प्रलंबित अनुदान जमा करणे बाबत सूचना दिल्या.तर संबंधित एजन्सीद्वारे उर्वरित घरांचा सर्वे करून अनुदान मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबरोबरच नसरापूर येथील मुख्य १० मीटर रुंदीचा रस्ता करणेबाबत पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करणे बाबत समन्वय झाला व इतरही रस्ते मंजूर करण्यात यावे याची मागणी करण्यात आली.यावेळी भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे, मुळशी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे ,मुळशी बाजार समितीचे संचालक दादाराव मांडेकर ,राहुल शेडगे, अंकुश खाटपे, भुगाव सरपंच अर्चना सुर्वे ,माजी सरपंच निकिता सणस ,सचिन आंग्रे ,सचिन हगवणे रमेश सनस उपस्थित होते.
COMMENTS