जावली ! चोरांच्या हातात बाजार समितीची सत्ता देवु नका :पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे सभासदांना आवाहन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - कृषी उत्पन बाजार समिती राष्ट्रवादीची असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पूर्ण पॅनल देवुन निवडणूक  लढविण्याचा विचार झाल्या नंतर भाजपच्या दारात जावुन आम्हाला पाच जागा द्या असे म्हणणे हि केवीलवाणी घटना असून चोरांचे हातात कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता सभासदांनी देवु नये अशी विनंती करीत महविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन माजी आ. सदाशिव सपकाळ , जि.प. सदस्य दिपक पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
         मेढा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीची बैठक झाली या बैठकीत आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यासह उपस्थितांचे बरोबर चर्चा होवुन जावली महाबळेश्वर जावली बाजार समिती ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला. परंतु संस्था अडचणीत असल्याचे कारण देत भाजपच्या दारात जावुन हात मिळवणी केली गेली. याबाबत आम्हाला विश्वासात आ. शशिकांत शिंदे यांनी घेतले नाही असा आरोप दिपक पवार यांनी केला.
             आ. मकरंद पाटील व आ. शशिकांत शिंदे हे आमचे नेते आहेत परंतु त्यानी त्यांनी भाजप बरोबर न जाता महाविकास आघाडी बरोबर राहीले पाहीजे होते. आमचे नेते आ. अजितदादा पवार मेढ्यामध्ये आले असता राष्ट्रवादीच्या सर्वांनी एकसंघ राहुन 
आपलीच निवडणूका लढा असे आवाहन आठ दिवसापूर्वी केले असताना भाजपच्या दारात जागा मागायला गेले याचे वाईट वाटत असल्याचे सांगुन महाबळेश्वर पाच जावली पाच आणि मित्र पक्षांना आठ अशा जागा ठरलेल्या असताना महाविकास आघाडीचा विचार न करता भाजप बरोबर हात मिळवणी केली असली तरी आमचेच महाविकास आघाडीच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी सदाभाऊ सपकाळ व दिपक पवार यांनी दिला.
           माजी आ. सदाशिव सपकाळ म्हणाले शेतकर्याना खऱ्या अर्थाने शेती पिकाला भाव मिळावा म्हणून सातारा मार्केट मधून जावली महाबळेश्वर साठी वेगळी मार्केट संस्था करण्यासाठी १९९५ ला आमदार असताना प्रयत्न केले परंतु याचा आदेश निवडणुका नंतर मिळाला.  शेतकर्याना न्याय मिळण्या ऐवजी येथे राजकिय समिकरणे घडू लागली हे आता समोर आले आहे. सत्ता भोगताना संस्था अडचणीत आणायच्या आणि नंतर अडचणीत आहेत असे सांगायचे हे सध्याचे गणित आहे असे सांगुन आठ दिवसापूर्वी कोणाची उंची किती हे सांगणारे आज एकत्र संगती एकमेकांची मस्करी करीत फिरत आहेत हे दुदैव्य आहे असे सांगुन कारखान्याला निवडणूक लादुन २० लाख तोट्यात घातला सांगणारानी भंगार विकून किती खाल्ले याचा हिशेब द्यावा अशी मागणी केली.
             यावेळी बाजार समितीच्या मुताऱ्या विकल्या , बैल बाजार विकला असा आरोप भोसले याच्यावर दिपक पवार यांनी करून आ. शिंदे, आ. पाटील, सदाशिव भाऊ एकत्र येवुन पॅनल केले असते तर भाजपला उमेदवार मिळाला नसता असे दिपक पवार यांनी सांगुन  जुन्या संचालकांना पुन्हा संधी देवुन चोर पॅनलला निवडून देवु नका असे आवाहन पवार यांनी केले तर महाविकास आघाडीच्या विमान चिन्हावर मतदान करून उमेदवार विजयी करा आवाहन सर्वांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.
              यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदिप पवार यांनी शेतकर्याना देशोधडीला लावुन कार्यकत्याला पाच वर्षाची सोय करून देणार्याना हद्दपार करा असे सांगलीतले. याप्रसंगी सुधीर पवार, नितीन गोळे, संतोष चव्हाण, अशोक परामणे, सचिन करंजेकर, रविंद्र पार्टे, उमेश दुर्गावळे, आनंदराव पोफळे, वसंत शिंदे, अशोक साळुंखे , गणेश जगताप, अशोक परामणे, भानुदास भोसले आदी पदाधिकारी आणि मधुकर पोफळे, सर्जेराव मर्ढेकर, रविंद्र गोळे , बजरंग गुजर, रमेश सपकाळ, लक्ष्मण जाधव, साईबाबा जगताप, सौ. विद्या कदम, गणेश कवी आणि भास्कर जाधव हे उमेदवार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सुधीर पवार यांनी मानले.
To Top