-
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी (धनंजय गोरे)
अखिल गुरव समाज संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बंधू भगिनी यांनी आपल्या समाजाच्या अनेक अडचणी संबंधी सरकारला जागे करण्यासाठी दोन वेळा आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले त्याला सरकारच्या वतीने व अनेक पक्षांच्या आमदारांनी फक्त आश्वासने दिली पण प्रत्यक्षात कोणीही सकारात्मक प्रतिसाद देऊन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. अनेक वेळा एकाचवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सनदशीर मार्गाने दिलेत. पण सर्व निरर्थक, वर्षानुवर्षे स्वातंत्र्यानंतरही गुरव समाजाचा ससेमीरा थांबलेला नाही. म्हणून सर्व इनाम वर्ग ३ जमीन धारक मौलवी, पाद्री तसेच हिंदू समाजातील बारा बलुतेदार यांनी अहमदनगर येथे अखिल गुरव समाज संघटना व अखिल भारतीय किसान सभा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ एप्रिल ते २८ एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरापर्यन्त लॉंग मार्च होणार असून सातारा जिल्ह्यातील गुरव समाजातील बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान गुरव समाज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त ऑ.कॅप्टन शिवाजी साखरे यांनी केले
सदरचा लाँग मार्च डॉ. अजित नवले सचिव अखिल भारतीय किसान सभा महासंघ व अँड.आण्णासाहेब शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अडचणी सोडविण्यासाठी होणार आहे.
यामध्ये देवस्थान इनाम वर्ग ३च्या जमिनी खालसा करणे व मुळ सनद धारकांना कायम स्वरुपी देणे,बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या देवस्थान इनाम वर्ग 3 मुळ सनद धारकांच्या नावे पुन्हा करण्यात यावेत,देवस्थान इनाम वर्ग ३ मधील बेकायदेशीर कुळ काढण्यात यावे,देवस्थान गाभाऱ्यात देवा समोरील उत्पन्नावर पुजा-याचा हक्क असावा,ज्या देवस्थान मध्ये समस्त पुजारी आहेत त्या ठिकाणी ५० टक्के विश्वस्त मंडळात प्रतिनिधित्व मिळावे,देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनीवर पिक कर्ज मिळावे.या सह विविध मागण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरापर्यन्त लॉंग मार्च होणार आहे