सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आनंदराव जगन्नाथ टकले यांना जळीत ऊस झाल्या प्रकरणी महावितरण कंपनी कडून २ लाख ११ हजार
७९७ रुपये मंजूर झाले होते. विजबिलाची थकबाकी वजा करून उर्वरित रकमेचा चेक राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२१-२०२२ सुरू झाला त्या नंतर कार्यक्षेत्रा मधे ऊस जळीत होण्याच्या घटना होऊ लागल्या. सस्तेवाडी गावातील कदमवस्ती या ठिकाणी आपल्या कारखान्याचे सभासद सतीश हरीभाऊ कदम यांचा ऊस महावितरण यांच्या वीजवाहक तारांनच्या घर्षणा मुळे जळीत झाल्याचे पाहणी केल्या नंतर समोर आले. कारखाना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी २० दिवस अगोदर सस्तेवाडीचे सभासद आनंदराव जगन्नाथ टकले यांचाही दोन (२) एकर ऊस याचं कारणाने जळीत झाल्याचे
समजले. या दोन्ही घटना लक्षात आल्या नंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला, सभासदांना देण्यात यावी अशी मागणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी केली. अधिकाऱ्यांनी कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगीतले आणि कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर जर महावितरण जबाबदार असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगीतले.
त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ पासून ऋषिकेश गायकवाड यांनी सभासदांना बरोबर घेऊन कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सुरवात केली. संचालक गायकवाड यांनी ३ जानेवारी २०२३ मधे आपल्या कारखान्याचे सभासद आनंदराव जगन्नाथ टकले यांना महावितरण कंपनी कडून २ लाख ११ हजार ७९७ रुपये मंजूर करण्यामध्ये यशस्वी झाले.
----------------------
माझी कर्यक्षेत्रातील सर्व शेतकरी,सभासद बंधूंना विनंती आहे आपला ऊस महावितरन कंपनीच्या वीजवाहक तारांमुळे जळीत झाल्यास महावितरण कंपनीकडून नुकसाभरपाई मिळण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीने आम्ही भरपाई मिळे पर्यंत सभासदांना सहकार्य करू.
ऋषिकेश गायकवाड
संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना