बारामती ! बहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध संपवत नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न : दोन युवकांना शहर पोलिसांकडून अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
बारामती :प्रतिनिधी
दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी अभिषेक प्रकाश वनवे वय 21 वर्ष पतनशहा नगर बारामती या युवकाला आरोपी याच्या बहिणी सोबत असलेले प्रेम संबंध तो संपवित नाही या कारणासाठी आरोपी गौरव राकेश वर्मा वय 21 वर्ष व गणेश सुभाष गरगटे वय 23 वर्ष दोघे राहणार श्रावण गल्ली यांनी त्याच्यावर देशमुख चौकात बोलून घेऊन चाकू त्याच्या पोटात खूपसून जीवघेणा हल्ला केला. आणि दोन्ही आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले.
          सदर जखमी याला सुरुवातीला बारामतीमध्ये व नंतर ससून रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. बारामती पोलिसांना दवाखान्यामधून खबर मिळाली नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून खुनाचा प्रयत्न व कट यासारखा गुन्हा दाखल केला. दोन दिवस आरोपींचा रात्रंदिवस शोध घेऊन त्या दोघांना 19 तारखेला अटक करून त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात हत्यार वापरलेला रक्ताने माखलेला चाकू जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल माननीय अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे माननीय पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे. यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर हे करत आहेत. यातील जखमी युवकावर शस्त्रक्रिया होऊन सध्या तो ससून रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. यापुढे धारदार हत्यार चाकू कोयता वापरून हल्ला केल्यास कुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरी किरकोळ स्वरूपातील असणारी तंटे वाद हे पोलीस स्टेशनला कळवावे कायदा कोणी हातात घेऊ नये त्यामुळे उर्वरित आयुष्यात गुन्हेगारीचा शिक्का लागू शकतो.
To Top