सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधक एकवटले असून संघर्ष परिवर्तन पॅनल स्थापन केला गेला आहे.यात चार पक्ष एकत्र येवून १८ जागांसाठी १४ जागांवर राष्ट्रवादी -१०,शिवसेना -३ तर भाजपा -.१ असे उमेदवार रिंगणात आहेत.विरोधकांनी एकत्र येऊन कितीही आटापिटा केला तरी बाजार समितीवर काँग्रेसचीच एकहाती सत्ता राहणार असल्याची चर्चा जनतेतून होत असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसला संघर्ष परिवर्तन पॅनलचे कितीही कडवे आवाहन असले तरी काँग्रेस सर्व जागांवर निर्विवाद सत्ता राखणार आहे. निवडणूक होण्यापूर्वीच चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कितीही आघाडी केली तरी फरक पडणार नाही
इतरवेळी विरोधात लढणारे निवडणुकीला एकत्र येवून आघाडी करतात.कितीही आघाडी केली तरी काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही.बाजार समितीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची एकहाती सत्ता राहणार आहे असे बाजार समितीचे माजी सभापती अंकुश खंडाळे यांनी सांगितले.