सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात वैद्यकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सिपाका आयसीयू मेदिनी हॉस्पिटलच्या स्टाफमधील रवीकुमार पी. व त्याचा मित्र या दोघांनी मिळून भोर शहरात रात्रीच्या वेळी मद्य पिऊन काही तरुणांशी उद्धटपणे वागून धिंगाणा केल्याची घटना घडली.
शहरात दोन वेळा या स्टाफच्या माध्यमातून मद्य पिऊन बाहेरील तरुणांशी वादीवाद झाल्याचे समोर येत आहे.वैद्यकीय सेवेत असताना मद्य पिवून भांडण - तंटा करण्याच्या कारणावरून सिपाका आयसीयू व मेदिनी हॉस्पिटल यांच्याकडे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असून रुग्ण या सेवेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.